
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडात पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम जास्त
राज्य सरकारने आंबा पिकासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली असली तरी रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडात विम्याची रक्कम जास्त का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.याच योजनेसाठी रत्नागिरीत बागायतदारांना हेक्टरी १३ हजार ३०० तर सिंधुदुर्गात हेक्टरी ७ हजार रुपयांचा हप्ता बागायतदारांसाठी निश्चित करण्यात आला आहे, मात्र रायगडमधील शेतकऱ्यांना हेक्टरी २९ हजार ४०० रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात विम्याच्या हप्त्याचे दर जास्त का, असा सवाल आंबा बागायतदार संघटनांनी उपस्थित केला आहे. जवळपास पन्नास टक्के आंबा उत्पादक बागायतदारांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. विमा हप्त्याची रक्कम कमी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com