पालकमंत्री वायकर यांच्या प्रयत्नामुळे पाटण एस.टी आगारात अडकलेल्या जिल्ह्यातील ७० प्रवाशांना मिळाली मदत

पाटण येथील प्रवासात रत्नागिरी जिल्ह्याती संगमेश्वर तालुका, चिपळुण व गुहागर तालुक्यातील प्रवासी पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी स्थानिक आमदार, निवासी जिल्हाधिकारी अन्य यंत्रणा तसेच ग्रामस्थांशी संपर्क साधून आगाराच्या आवारात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वेळीच मदत मिळवुन दिली. तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीचे सरपंच वसंत उजगांवकर हे प्रवासादरम्यान पाटण एस.टी आगारात अडकले आहेत. त्यांच्यासह संगमेश्वर, चिपळूण, गुहागर आदी तालुक्यांमधील ७० पेक्षा अधिक प्रवाशी पुराच्या पाण्यात अडकल्याची बाब रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे यांना समजताच तुकाराम येडगे यांनी याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांना लक्ष घालण्याची विनंती केली. पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी स्थानिक आमदार शंभुराजे देसाई तसेच सतेज पाटील यांना मदतीचे आवाहन केले तर पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे तसेच निवासी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, यांच्याशी संपर्क साधला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षीतस्थळी हलवून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या सूचनेनुसार पुरात अडकलेल्या प्रवाशांना पाटण येथील साळुंखे हायस्कूलमध्ये सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले. रस्ता मोकळा होईपर्यंत या सर्व प्रवाशांची या ठिकाणी काळजी घेण्यात येणार आहे.
संगमेश्वर, चिपळूण, गुहागर आदी तालुक्यांमधील पाटण एस.टी आगारात अडकलेल्या सर्व प्रवाशांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून सुरक्षीत बाहेर काढण्यात आले असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button