इमारत बांधकाम नोदणी कृत कामगारानां ऑन लाईन पद्धतीने नुतनीकरण करण्यास कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप
इमारत बांधकाम नोदणी कृत कामगारानां ऑन लाईन पद्धतीने नुतनीकरण करण्यास सांगितले असले तरी ज्या कामगारानी दोन तीन महिन्यापूर्वी संगणिकृत अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या अर्जाची अद्याप छाननी झालेली नाही. के सी जैन नगर येथिल लेबर ऑफिस मध्ये कामगारानी या बद्दल माहिती विचारली असता माहिती साहेबाच्या कडे आहे साहेबाना वेळ मिळाला की पुढील प्रोसेस चालू होईल आणि आपल्याला नोदाणिकृत मोबाईलवर मेसेज येईल असे सांगितले जाते . आणि अशीच उत्तरे इतर विविध योजनाच्या अर्जाच्या बाबत असेच सांगितले जाते त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या कामगांराना नाहक त्रास सोसावा लागत आहे या बाबत कामगारांनी अनेक तक्रारी करूनही कोणीही या कडे लक्ष देत नाही यामुळेच कामगारांना हेलपाटे पडत असून याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी होते
www.konkantoday.com