ओखा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचेपाच लाख २७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्याने पळवले
ओखा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चोरट्याने पळवले. हा प्रकार आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास रत्नागिरी स्थानकाजवळ घडला. पर्समध्ये सुमारे पाच लाख २७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम होती.याबाबत येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर रेल्वेतील हा चोरीचा मोठा प्रकार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : प्रमिला प्रभाकर तळेकर (वय ६०, रा.गडगेसखलवाडी, फोंडाघाट) आणि त्यांचे भाऊ शिवराम दत्तराम सावंत (५०) एर्नाकुलम एक्स्प्रेसने (ओखा) कणकवलीकडे येत होते. श्रीमती तळेकर वसई रेल्वे स्थानकामध्ये गाडीत बसल्या, तर भाऊ सावंत पनवेल रेल्वे स्थानकांमध्ये एस चार बोगीमध्ये बसले होते.
पहाटेच्या सुमारास ओका एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकाजवळ आली असता संशयित श्रीमती तळेकर यांच्या सीटलगत आला. गाडी स्लो झाल्यानंतर त्याने श्रीमती तळेकर यांच्या खांद्यावरील पर्स खेचली. लागलीच श्रीमती सावंत यांनी त्याचा पाठलाग केला; पण संशयित चोरटा गाडीतून उडी मारून पळाला. सुमारे पाच लाख २७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम पर्समध्ये होती
www.konkantoday.com