नवी मुंबई लवकरच ‘फ्लेमिंगो सिटी’ या नावानेही ओळखली जाणार
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत १० ते ४० लाख लोकसंख्येत देशात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने आणखीन महत्त्वाची पावले उचलली आहेत.स्मार्ट सिटी, प्लॅन सिटी, सायबर सिटी अशा अनेक बिरुदावल्यांमुळे ओळखली जाणारी नवी मुंबई लवकरच ‘फ्लेमिंगो सिटी’ या नावानेही ओळखली जाणार आहे. ऐरोली ते बेलापूरच्या खाडी किनाऱ्यापर्यंत येणारे परदेशी पाहुण्यांमुळे नवी मुंबईला अनोखी ओळख देण्याचा विचार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी
केला आहे.
या पुढे शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सौंदर्यकरण करताना रंगवल्या जाणाऱ्या भिंती, पदपथ, उड्डाणपूल यांच्यावर फ्लेमिंगोचे चित्र, त्यांचे वास्तव्याच्या जागा आणि जीवनशैली दाखवण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता महत्त्वाच्या उपाययोजना महापालिकेतर्फे केल्या जाणार असल्याचेही बांगर यांनी सांगितले
www.konkantoday.com