महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या कारभारामुळे राज्यातील आयुर्वेद डॉक्टरांना मनस्ताप

राज्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) मार्च २०१९ मध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ‘एमसीआयएम तत्पर’ अ‍ॅप बनवले होते. या अ‍ॅपमधून राज्यातील ६० हजारांपेक्षा अधिक आयुर्वेदिक डॉक्टरांनी नोंदणी केली होती. मात्र या नोंदणीच्या प्रक्रियेत एमसीआयएमच्या कारभारामुळे खर्‍या डॉक्टरांवरच आपण बोगस डॉक्टर ठरणार का अशी भीती निर्माण झाली आहे
नवीन प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असल्याने एमसीआयएमचे सदस्य व सर्वसामान्य रुग्णांनाही प्रमाणपत्राची पडताळणी करून डॉक्टरांची तपासणी करणे शक्य होऊन बोगस डॉक्टरांना आळा घालणे शक्य होईल, असे सांगितले. त्यानुसार राज्यातील तब्बल ६० हजारपेक्षा अधिक नोंदणीकृत डॉक्टरांनी नोंदणी केली. मात्र नोंदणी केल्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त डॉक्टरांना अद्याप प्रमाणपत्र वितरित झालेली नाही. मात्र ज्या आयुर्वेदिक डॉक्टरांना एमसीआयएमकडून प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. त्यावर एमसीआयएमकडून केलेल्या घोळामुळे डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
महाराष्ट्र आयुर्वेद विज्ञान विद्यापीठाची (एमयूएचएस) स्थापना १९८८ मध्ये झाली असतानाही १९८३ मधील डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर एमयूएचएसचा उल्लेख करण्यात आला आहे. उत्तीर्ण झालेले वर्ष-तारीख यात विसंगती असणे, प्रमाणपत्रावर पदवीचा उल्लेखच नसणे, अतिरिक्त गुणवत्ता मिळवलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर तसा उल्लेख नसणे आणि काही डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर अभ्यासक्रम आणि विद्यापीठासमोर ‘निरर्थक’ असा उल्लेख करण्यात आला आहे. अशा अनेक चुका आयुर्वेदिक डॉक्टरांना वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर करण्यात आला आहे. त्यामुळे आयुर्वेदाची पदवी घेतलेल्या या डॉक्टरांकडे प्रमाणपत्र आहे, परंतु ते प्रमाणपत्र पाहिल्यास ते बोगस डॉक्टर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button