रत्नागिरी शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासून पहा : भाजपा शहर चिटणीस निलेश आखाडे यांची मागणी.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असून रस्त्यांच्या दर्जा चांगला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन रस्ते तयार करून महिना ही होत नाही तोच यावर पुन्हा खड्डे पडत आहेत. रत्नागिरी शहर मारुती मंदिर सर्कल परिसरात अशाच नवीन रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहे; यामुळे होत असलेली रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची तर होत नाहीत ना असे वाटू लागले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले खडी डांबर निघत असून त्यावर खड्डे पडत आहेत.
यामुळे प्रतिवर्षी पावसात रत्नागिरी शहर वासीयांना याचा प्रचंड त्रास होतो. आणि दर वर्षी हे खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्चही केले जातात. त्यामुळे जनतेच्या कररूपी पैसा वाया जात आहे. त्यामुळेच रस्त्यांची होत असलेली कामे ही उत्कृष्ट दर्जाची होणे आवश्यक आहे. महोदय आपणास या पत्राद्वारे विनंती करू शकतो की शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचे ऑडीट करून या रस्त्यांचा दर्जा तपासावा.व जनतेला चांगले दर्जाचे रस्ते मिळावेत. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे भ. वि.जा. जिल्हाध्यक्ष शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.आहे
www.konkantoday.com