
गुहागर मार्गावरदुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील गुहागर बायपास मार्गावर दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या प्रदीप नारायण लिबे (वय 47, रा. कामथेखुर्द-हरेकरवाडी) यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबे हे चिपळूण येथील जिप्सी कॉर्नर हॉटेलमध्ये कामाला होते. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी ते हॉटेलमालक शेटय़े यांची दुचाकी घेऊन कामथे-हरेकरवाडी येथे जात असताना, गुहागर बायपास मार्गाजवळ दुचाकीवरील ताबा सुटून ती घसरली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच 4 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.




