६० वर्षांनंतर पानवल धरणाच्या दुरुस्तीबाबत हालचाली सुरू

0
179

गेल्या साठ वर्षात पानवल धरणाची एकदाही मोठी दुरुस्ती केलेली नाही. धरणामुळे पालिकेची वर्षाला १ कोटी २० लाखांची आर्थिक बचत होते, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने धरणाला ५० टक्के गळती सुरू आहे.
नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) शहराला पाणी पुरवणारे हे धरण आहे, तरी या धरणाच्या दुरुस्तीचा ६० वर्षांमध्ये एकदाही विचार झाला नसल्यामुळे धरणाची भिंत कमकुवत झाली आहे.
सुमारे ००.५४० दशलक्ष घनमीटर एवढी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आहे; मात्र गळतीमुळे पाणीच साठून राहत नाही. परिणामी शीळ धरणावर ताण पडत असून, पाणी उचल करण्यावर पालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. ६० वर्षांनंतर पानवल धरणाच्या दुरुस्तीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. रेड झोनमध्ये नसले तरी गळती चिंताजनक आहे. धरणाची भिंत, पाया आधी भागातून मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी साठून राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यातच या धऱणाचा शहराला पाणी पुरवण्यासाठी चांगला वापर होत आहे. त्यानंतर महिनाभरातच पाणी तळ गाठते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
५८ वर्षांमध्ये पानवल धरणाची दुरुस्ती किंवा गाळ काढण्यात आलेला नाही. धऱणाला ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सर्वसाधारण सभेत दिली हाेती
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here