राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत , ऋतुजा जाधवचे सुयश
रत्नागिरी – सं. ग्रा. वै. व सा. स. प्रतिष्ठान संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओंदे ता.विक्रमगड जि.पालघर सांस्कृतिक विभागाकडून ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत भारत शिक्षण मंडळाच्यादेव-घैसास-कीर ,कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.ऋतुजा शरद जाधव या विद्यार्थीनीच्या घटनेचे शिल्पकार या स्वरचित कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.ऋतुजाला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.वैभव किर यांनी मार्गदर्शन केले.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या सौ मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ वसुंधरा जाधव, प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
www.konkantoday.com