दगडफेकीतून वाचण्यासाठी बसचालकाने शोधून काढली नामी शक्कल, हेल्मेट घालून चालविली बस
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे विलीनीकरणाला पर्याय म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. सरकारच्या या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या. परंतु, काही संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. संपावर ठाम असलेल्या संघटना बस वाहतूक सुरू करण्यास विरोध करीत आहेत यामुळे काही ठिकाणी बसवर दगडफेकी सारखेही प्रकार झाले. अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी अलिबाग आगारातील बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवल्याचे पाहायला मिळाले.मुरुडकडे एसटी बस घेऊन जाणाऱ्या चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करत बस चालवत नेली त्यांच्या या अनोख्या फंड्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती
www.konkantoday.com