जिल्हास्तरीय औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेला ५ डिसेंबरपर्यत मुदतवाढ

रत्नागिरी दि.३०: रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्याचा वाढता प्रतिसाद पाहता पीपीटी/नोंदवही पाठवण्याची मुदत ५ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

स्पर्धा दोन भागात होणार असून पहिला भाग वनस्पतीचे फोटो व त्यांची जास्तीत जास्त औषधी गुणधर्म माहिती संकलित करून पीपीटी बनवणे तसेच ज्या विद्यार्थ्याकडे संगणक उपलब्ध नसतील त्या विद्यार्थ्यानी वनस्पतीचे कलर फोटो चिकटवून त्या वनस्पतीचे जास्तीत जास्त औषधी गुणधर्म माहितीचे संकलन करणे असे स्वरुप आहे स्पर्धा ६ वी ते ८वी,९ वी व १० वी ,११ वी व १२ वी अशा तीन गटांत होणार असून तीनही गटासाठी प्रथम क्रमांक २०००/-, द्वितीय क्रमांक १५००/-,तृतीय क्रमांक १०००/- ,उत्तेजनार्थ चार बक्षिसे प्रत्येकी ५००/- असे बक्षिसाचे स्वरुप आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यामधील औषधी वनस्पतीबद्दल जागरुकता निर्माण करणे, आपल्या सभोवतालच्या विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे व मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे फायदे याची माहिती संकलित करणे, विद्यार्थ्यामधील निरिक्षण शक्ती वाढविणे, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि वैज्ञानिक शोधक वृत्ती वाढीस लावणे.आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्लक्षित व दुर्मिळ वनस्पतींचे ज्ञान, शोध व औषधी गुणधर्म यांची माहिती संकलन व उपयोग जाणून घेणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्याने एकाच स्वरूपातील स्पर्धेत सहभाग घ्यावा , नोंदवही व पीपीटी शक्यतो मराठी किंवा हिंदी भाषेत असावी ( नोंदवहीवर स्वतः काढलेली छायाचित्र असावीत), नोंदवही स्व हस्ताक्षरातील किंवा स्वतः काढलेली छायाचित्रे वापरून संगणकीकृत केलेली असावीत अथवा प्रत्यक्ष झाडाचे पान, फूल लावावे.स्पर्धेचा कालावधी ११ ऑक्टोबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ असा असणार आहे.या कालावधीत आपण माहिती गोळा करणे, सर्वेक्षण करणे त्यांचे उपयोग, आयुर्वेदीक स्थान यासंबंधी माहिती गोळा करणे.आपल्या भागात उपलब्ध असलेल्या वनस्पतीची माहिती फोटोसह असावी. परिक्षक स्वतःयेऊन पण परिक्षण क्षेत्राची पहाणी करु शकतात.आपली पीपीटी / नोंदवही दिनांक ०५ डिसेंबर २०२१ पर्यंत संपदा धोपटकर, जेएसडब्ल्यू एनर्जी लि.सी एसआर ऑफिस मु नांदिवडे कुणबीवाडी पो.जयगड ता.जि रत्नागिरी -४१५६१४ या पत्त्यावर पोहोचेल याची काळजी घ्यावी त्यानंतरही आलेल्याची नोंद अथवा विचार केला जाणार नाही.

या स्पर्धेत ज्या शाळेतील जास्त विद्यार्थी सहभागी होतील अशा शाळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात येणार आहे, स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव,शाळेचे नाव ,इयत्ता, मोबाईल नंबर, घरचा पूर्ण पत्ता व पिनकोड क्रमांक असा तपशील द्यावा. तज्ञ परिक्षकांकडून स्पर्धेचे परीक्षण करुन निकाल जाहीर केला जाईल.परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अधिक माहितीसाठी रविंद्र इनामदार-९४२२३८२०८४,प्रभाकर सनगरे-९४२३०५००२९,८२७५९१३९२३ यांच्याशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, विज्ञान शिक्षक मंडळाचे पदाधिकारी व जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button