
रेल्वे ट्रॅक वर अज्ञात इसमाचा रेल्वे मधून प्रवास करत असताना पडून मृत्यू
संगमेश्वर ते उक्षी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक वर अज्ञात इसमाचा रेल्वे मधून प्रवास करत असताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदरच्या इसमाची ओळख पटवण्याचे काम संगमेश्वर पोलीस करत आहेत. अनोळखी इसम वय-४० ते ४५ वर्षे, नाव गाव माहित नाही. हा संगमेश्वर ते उक्षीच्या कि.मी.नं १८१/६/७ च्या दरम्यान कोणत्यातरी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकच्या बाजुला पडला. त्याला मंगला एक्सप्रेसने रत्नागिरी स्टेशन येथे दि. २० रोजी सायंकाळी ५-१० वा. आणले. त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सदरच्या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली
www.konkantoday.com