आता ठाकरे सरकार अनिल परब यांचा रिसॉर्ट केव्हा पाडणार -माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सवाल
पालकमंत्र्यांचा मुरुड येथील रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि तसा अहवाल तयार झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन अॅथॉरिटीने सुद्धा हा रिसॉर्ट बेकायदा असल्याचे मान्य केले आहे.आता ठाकरे सरकार हा रिसॉर्ट केव्हा पाडणार असा प्रश्न माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांना रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत केला. अॅड. परब यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
पालकमंत्री अनिल परब यांच्या बेकायदेशीर मालमत्तेच्या विरोधात आक्रमक झालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या रत्नागिरीत आले असता त्यांनी ही माहिती दिली तर याचप्रकरणात २५नोव्हेंबरला राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी होणार आहे. तर ७ डिसेंबरला लोकायुक्तांकडे सुनावणी असल्याची माहिती त्यांनी दिली.
www.konkantoday.com