
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे फाटा येथे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे फाटा येथे बुधवारी सकाळी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकारणी ४ जणांनविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज मंडळाचे कर्मचारी केशव बुधाजी लेंडे बुधवारी सकाळी ते विद्युत विभागाचे कायदेशीर काम करत होते. तेव्हा संशयित त्याठिकाणी आले असता मेन लाईन वरील दुरुस्ती केल्याशिवाय गावातील दुरुस्ती करता येणार नाही, असे लेंडे यांनी त्यांना सांगितले.तेव्हा त्यांचे काहीही ऐकून न घेता संशयितांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला.
www.konkantoday.com