रत्नागिरीतील जलतरण तलावाला खेळाडूंची प्रतीक्षा
कोरोना काळात गेली दीड ते पावणेदोन वर्षे बंद असलेल्या जलतरण तलावाचा दरवाजा स्पध्रेत भाग घेणार्या खेळाडूंसाठी उघडला आहे. फक्त खास जलतरणपटूंना सरावासाठी खुला करण्यात आला असून इतर सर्वसामान्यांसाठी तलाव खुला करण्याचा विचार जिल्हा क्रीडा विभागाने केलेला नाही, मात्र खेळाडूंसाठी हा तलाव खुला होवूनही होवूनही अजून खेळाडूनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. जलतरण तलावाची स्वच्छता आणि पाणी बदलून सर्व काही सज्जता केली आहे परंतु आता जलतरण तलावाला खेळाडूंची प्रतीक्षा आहे. www.konkantoday.com