
खासदार सुनील तटकरे यांना आमदार भास्कर जाधव यांनी पेचात पकडले
विधान परिषदेत कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले या मुद्द्यावरुनच आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांना पेचात पकडले आहे शिवसेनेकडून त्यांच्या या शब्दाचे राजकीय भांडवल करण्यास सुरुवात केली आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी बोलताना तटकरे यांनी कुणबी समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि विधान परिषदेची उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी माझी व शिवसेनेचे ताकद उभी करू, असे आव्हान देत तटकरेंना चक्रव्यूहात अडकवले आहे. आता तटकरे ते चक्रव्यूह कसे भेदणार आणि विधान परिषदेच्या २०२४ च्या निवडणुकीत कुणबी समाजाला संधी देणार की पुन्हा आपल्याच मुलाला आमदार करणार, याकडे कोकणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.तटकरे लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मुलगी आदितीला निवडून आणले. सद्यस्थितीत सुनील तटकरे खासदार, मुलगी राज्यमंत्री आणि मुलगा आमदार अशी तीन पदे तटकरे यांच्या घरात आहेत.
www.konkantoday.com