रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी ८७.४५ टक्के मतदान
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी ८७.४५ टक्के मतदान झाले आहे. यापूर्वी सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.२१ नोव्हेंबरला सकाळी ९वाजल्यापासून जिल्हा नगर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दोन तासात सर्व जागांची मतमोजणी पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे विरूद्ध सचिन चंद्रकांत बाईत, मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते विरूद्ध राकेश श्रीपत जाधव, नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज विरूद्ध ॲड.सुजित भागोजी झिमण, दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण विरूद्ध अजित रमेश यशवंतराव, रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील विरूद्ध प्रल्हाद महादेव शेट्ये, लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर विरूद्ध महेश रवींद्र खामकर, गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी विरूद्ध चंद्रकांत धोंडू बाईत अशी लढत आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
www.konkantoday.com