
कोयना प्रकल्प इतर प्रकल्पांप्रमाणे बीओटी तत्त्वावर दिले जाण्याची शक्यता
कोयनेचा तिसरा टप्पा आणि कोयना धरण पायथा विद्युत गृह पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून अन्य काही प्रकल्पांप्रमाणेच बीओटी तत्त्वावर देखभालीसाठी दिला जाण्याची चिन्हे आहेत.बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार या प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती होणार असल्यामुळे कोयना प्रकल्पाची वाटचाल आता खासगीकरणाकडे सुरू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात जलविद्युत प्रकल्पांची उभारणी जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फत करण्यात येते.
प्रचलित कार्यनियमावलीनुसार हे प्रकल्प उभारणीनंतर भाडेपट्टी तत्त्वावर परिचलन व देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येतात. यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षांसाठी यापूर्वीच भाडेपट्टीने हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.
www.konkantoday.com