पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पास दिलाच पाहिजे, असे आदेशच सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय देण्यात आल्याने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना तत्काळ ई-पास मिळणारआहेत.मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर गणेशोत्सवाचा पर्याय देण्यात येत आहेत. सर्व पोलिस उपायुक्तांना पासला मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी ई-पासला विनाविलंब मंजुरी देण्याचे निर्देश सर्व उपायुक्तांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना प्रवासाचा पास देण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
पोलिसांच्या संकेतस्थळावरून ई-पासची परवानगी देण्यात येते. त्यामुळे साईटवरती गणेश फेस्टिव्हल असा एक नवा पर्याय देण्यात आला असून, त्यामुळे चाकरमान्यांना या ऑप्शनवर जाऊन ई-पासची परवानगी घेता येणार आहे.

गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button