संपात सहभागी असलेल्या रोजंदारीवरील कर्मचार्यावर कारवाई करण्याचा निर्णय
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासूून सुरु असलेला संप मिटत नसल्याने एसटी महामंडळाने कारवाईची धार आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब तसेच एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.संपात रोजंदारीवरील कर्मचारीही असल्याने त्यांना कामावर रूजू होण्यासाठी महामंडळाने थेट सेवा समाप्तीच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे. कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देतानाच या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत.
राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक व वाहकही आहे. संपात हे कर्मचारीही सामिल आहे. या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून कर्तव्यावर हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाईल. नोटीस बजावल्यानंतर २४ तासांत कर्मचारी कामावर न परतल्यास कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई सेवा समाप्तीची असेल, असेही स्पष्ट केले.
www.konkantoday.com