
कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता -आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लशीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. हे प्रमाण वाढवायचे असेल, तर कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे.
अलिकडेच दूरदृश्य संवादाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीच्या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख बाठिया यांच्यासमोर आपण हा प्रस्ताव मांडला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
टोपे म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रांमधील अंतर २८ दिवस तर कोविशिल्डच्या संदर्भात हे अंतर ८४ दिवस आहे. कोविशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर कमी करता येईल का, याचा विचार मात्र शास्त्रीय पद्धतीनेच होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयएमसीआर आणि या संदर्भातील अन्य संशोधन संस्थांचा अभिप्राय यासाठी महत्त्वाचा असेल. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात लशीची पहिली मात्रा १०० टक्के देण्याचे प्रयत्न आहेत.
www.konkantoday.com