
उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला.
उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.तर शनिवारी पुण्यात किमान तापमान ९.८ अंश नोंदवण्यात आले. याशिवाय मुंबईत पारा १६ अंशापर्यंत खाली आला आहे.महत्त्वाचे म्हणजे पुढचे दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी धुळ्यात राज्यातील नीचांकी ६.६ अंश तापमान नोंद झाली. तर निफाड, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नागपूर, गोंदिया येथे पारा १० अंशाखाली आला. काही ठिकाणी धुक्यासह दव पडल्याचे दिसून आले.विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे