रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे लग्न समारंभासाठी जमलेल्या दोघांना मारहाण

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे लग्न समारंभासाठी जमलेल्या दोघांना कोणत्यातरी हत्याराने तसेच दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदनान भाटकर,मुसेफ साखरकर,यासीर साखरकर,रजिन होडेकर,मुईन भाटकर आणि ताहिर साखरकर (सर्व रा.नवानगर भाट्ये,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात सरोज बशीर साखरकर (20,रा.नवानगर भाट्ये,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार,बुधवारी दुपारी भाट्ये नवानगर येथे गावातील लग्न समारंभ असल्याने गावातील इतर मंडळी व सरोज आणि त्यांचे भाउ साकिब आणि आयान साखरकर हे सर्व गप्पा मारत उभे होते.
त्यावेळी संशयित मुसेफ आणि यासीर साखरकर या दोघांनी तिथे येउन अज्ञात कारणातून सरोज यांचा भाउ साकिबला कोणत्यातरी हत्याराने व दांडक्याने मारहाण केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button