वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा रत्नागिरीतही काम बंद आंदोलन
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ जणांचा बळी गेला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह एका परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे. तर यामध्ये दोन परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद रत्नागिरीत उमटू लागले आहेत. संबंधित अधिकारी कर्मचार्यांवरील कारवाई येत्या २४ तासात मागे घेण्यात यावी, अन्यथा ११ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना देण्यात आले आहे. www.konkantoday.com