राज्यात इंधनावरील टॅक्स दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय होऊ शकतो
केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट (VAT) पाच रुपयांनी कमी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने इंधनावरील टॅक्स दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे.
www.konkantoday.com