अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने आज मराठी रंगभूमी दिन साजरा होणार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाणार आहे.
सकाळचे सत्रात सकाळी ११.०० वा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील नगराध्यक्ष यांचे दालनामध्ये ना. श्री. उदय सामंत मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांचे शुभहस्ते नटराज पूजन संपन्न होईल.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षपदी जेष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्री. शशांक पाटील यांची निवड झाली आहे तरी त्यांचा सत्कार मंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न होईल.सदर कार्यक्रमावेळी रत्नागिरीच्या स्थानिक रंगकर्मींच्या रंगभूमीविषयक असलेल्या अडचणींचे निवेदन नाट्य परिषद रत्नागिरीच्या वतीने मंत्री महोदय यांना देण्यात येईल.सायंकाळचे सत्रात सायंकाळी ५.३० वा. नाट्यगृहाच्या समोरील प्रांगणामध्ये रत्नागिरी येथील स्थानिक रंगकर्मींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न होतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समीर इंदुलकर, कार्याध्यक्ष
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com