
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ११ ब मधील ’महिला सर्वसाधारण’ वर हरकत
रत्नागिरी नगर परिषद निवडणूक २०२५ साठी नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीवर शहरातील रहिवासी अमेय परुळेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. तातडीने प्रभाग क्रमांक ११ (ब) साठीचे ’महिला सर्वसाधारण’ आरक्षण रद्द करावे. त्याऐवजी ’सर्वसाधारण’ करण्याची मागणी केली आहे. तसेच, रद्द कैल्लेले ’महिला सर्वसाधारण’ आरक्षण ज्या प्रभागात मागील वेळी महिलांसाठी नव्हते, अशा दुसर्या प्रभागात देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हरकत नोंदवली रोजी यासंदर्भात ऑक्टोबर मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, यांच्याकडे त्यांनी रितसर आहे. परुळेकर यांच्या म्हणण्यानुसार, ८ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक ११ (ब) (जुना प्रभाग क्रमांक १० ब) साठी ’महिला सर्वसाधारण’ हे आरक्षण पुन्हा पडले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मागील निवडणुकीतही याच प्रभागात महिलांसाठी आरक्षण होते आणि तेव्हा महिला उमेदवारांनी ९ निवडणूक लढवली होती असे त्यांनी नमूद केले आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये प्रभाग ११ (ब) मध्ये ’महिला सर्वसाधारण’, ’पुरुष मागासवर्ग’ आणि ’महिला मागासवर्ग’ अशी विविध आरक्षणे झाली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा त्याच प्रभागासाठी ’महिला सर्वसाधारण’ आरक्षण कायम ठेवणे भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकाराचे (अनुच्छेद १४) उल्लंघन आहे.
www.konkantoday.com



