हर्णे येथील ब्रिटिशकालीन पॅसेंजर जेटीला लवकरच नवीन रुपडे येणार
हर्णे येथील ब्रिटिशकालीन पॅसेंजर जेटीला लवकरच नवीन रुपडे येत आहे. त्याचच भूमिपूजन तालुक्याचे आमदार श्री. योगेश कदम यांच्याहस्ते नुकतंच पार पडलं.
दरम्यान, हर्णे गावाला ब्रिटिशकाळात सुवर्णदुर्ग असे नाव होते त्यावेळी सुवर्णदुर्ग हा तालुका होता.जेटीच सुशोभीकरण होणं गरजेचं होतं याकरिता मच्छीमार बांधवांनी आमदार कदम यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याचाच विचार करून आमदार योगेश कदम यांनी मेरिटाईम बोर्डाकडून ५०,९०,४५५/- रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन त्याच भूमिपूजन केलं आहे. सदरची जेटी दोन्हीही बाजूने लांबी आणि रुंदीने वाढणार असल्याचं मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या पॅसेंजर जेटीला नवीन रूपडे मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
www.konkantoday.com