वॉचमनचा खून केल्यानंतर आरोपी वेदांतकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खुनासाठी वापरण्यात आलेला दांडका संशयित आरोपी वेदांतने घटनास्थळापासून काही अंतरावर झुडुपामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला होता. खुनाच्या तपासामध्ये ही बाब समोर आली असून पोलिसांकडून आता हा दांडका ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान खून करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांकडून आता पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम २०१ लावण्यात येणार आहे.अशोक महोदव वाडेकर (७०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. अशोक हे घरापासून जवळच असलेल्या श्री गणेश रेसिडेन्सी इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होते. याच इमारतीमध्ये संशयित आरोपी वेदांत चंद्रकांत आखाडे हा देखील वास्तव्यास असतो. संशयित आरोपी वेदांतने गच्चीची चावी मिळावी म्हणून वॉचमन वाडेकर यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र वाडेकर हे चावी देत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. अशोक वाडेकर चावी देत नसल्याच्या रागातून २७ एप्रिल रोजी संधी साधून वेदांत याने लाकडी दांडक्याने वार करून अशोक वाडेकर यांचा खून केला, असा आरोप वेदांत याच्यावर ठेवण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button