दापोलीत मतदार नोंदणी थांबवावी माजी युवासेना अधिकारी ऋषिकेश गुजर यांची मागणी
दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्रात आगामी नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदार नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी थांबविण्यात यावी आणि बोगस नोंदणी झाली असल्यास अशा लोकांची नोंदणी रद्द करावी अशी मागणी माजी युवासेना अधिकारी ऋषिकेश गुजर यांनी तहसिलदाकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपंचायतीची निवडणूक दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com