खेडशी येथे स्कूटर घसरल्याने कंटेनरखाली सापडल्याने वडिलांचा मृत्यू ,मुलगा जखमी
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी नाका येथे आज दुपारी दुचाकी घसरल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वडिलांच्या कंटेरनच्या मागील चाकाखाली येउन जागीच मृत्यू झाला.या अपघातात दुचाकी चालक मुलगाही गंभिर जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रकाश पालकर (६०,रा.शिरगाव आडी,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव असून त्यांचा मुलगा प्रथमेश प्रकाश पालकर (३०,रा.शिरगाव आडी,रत्नागिरी) याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रविवारी दुपारी प्रथमेश आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी वरुन वडिल प्रकाश पालकर यांना सोबत घेउन हातखंब्याच्या दिशेने जात होता.त्याच सुमारास श्रीकांत रामचंद्र बाबर (सांगोला जि.सोलापूर) हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच-46-बीबी-8371) मधून मच्छि घेउन मुंबईच्या दिशेने जात होता.ही दोन्ही वाहने खेडशी नाका येथे आली असता या कंटेरला ओव्हरटेक करताना प्रथमेशचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती घसरली.त्यामुळे प्रथमेश रस्त्याच्या उजव्या बाजुला फेकला गेला तर त्याचे वडिल प्रकाश पालकर कंटेनरच्या मागील चाकाखाली गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यूझाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली
www.konkantoday.com