संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे बिबट्याचा भरदिवसा गायीवर हल्ला

0
36

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा ह्या ठिकाणीमहेश पवार यांच्या मालकीची गाय चरत असताना काल दुपारी एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. रत्नागिरी कोल्हापूर हायवे नजिक नेहमी प्रमाणे कळपात चरणाऱ्या गायीवर गुराख्या देखत महेश पवार यांच्या गायी वर हल्ला करत ओढत नेले.यावेळी महेश पवार यांनी ओरडा ओरड करत लोकांना जमा करत वाघाला हुसकावून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र वाढलेले गवत असल्याने गायीला नेण्यात बिबट्या यशस्वी झाला. अनेक गावकरी वाघाला पळवून लावण्यासाठी ह्या ठिकाणी जमले. मात्र गाय गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली.महेश पवार यांनी वन अधिकाऱ्यांना ह्या घटनेचा माहिती दिली. ह्या घटनेमुळे गुराखी वर्गात घबराट पसरली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here