भंडारपुळे येथे आता दागिन्यांची नव्हे तर वडिलोपार्जित कागदपत्रांची चोरी

0
50

रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील बंद घर फोडून अज्ञाताने वडिलोपार्जित जागेची कागदपत्रे, कोर्टाची न्यायनिवाड्याची कागदपत्रे, दाव्याची कागदपत्रे, जुना सातबारा, नकाशे,फेरफार उतारे, हक्कसोडपत्र आदि कागदपत्रे चोरुन नेली.ही घटना 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे.
याबाबत कृष्णा वासुदेव सुर्वे (82, रा.यशोदा निवास भंडारपुळे, रत्नागिरी) यांनी जयड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार,नवरात्रोत्सवानिमित्त ते मुंबईहून भंडारपुळे येथील आपल्या घरी आले होते. दसरा झाल्यानंतर ते पुन्हा मुंबई गेले होते. दरम्यान गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. कृष्णा सुर्वे यांच्या शेजार्‍यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले असल्याची माहिती दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here