छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईतले पहिले ऑन व्हील रेस्तराँ
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईतले पहिले ऑन व्हील रेस्तराँ सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर रेस्तराँमध्ये केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लोहाटी यांनी या बद्दल माहिती दिली आहे.जे डब्बे रेल्वेसाठी उपयुक्त नाहीत अशा डब्यांचे आता रेस्तराँमध्ये रुपांतर होईल. या रेस्तराँचे कंत्राट निविदेद्वारे देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे हे रेस्तराँ चोवीस तास खुले राहणार आहे. या रेस्तराँमध्ये ग्राहक कधीही येऊन खाद्य पदार्थांची चव चाखू शकतात.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे फर्स्ट ऑन व्हील रेस्तराँ खुले करण्यात आले आहे. हे रेस्तराँ प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या प्रवेशद्वाराजवळ आहे. या रेस्तराँमध्ये एकावेळी ४० जण जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.
रेस्तराँमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. डाइन इन व्यतिरिक्त या ठिकाणी मिनी कँफे व ज्यूससाठी एक स्वतंत्र टेक अवे विन्डो सुद्धा उपलब्ध असणार आहे.
www.konkantoday.com