
धरणग्रस्त बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाले तरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील बाधित कुटुंबाचे अलोरे येथे पुनर्वसन करण्यात आले. येथील २४ घरांचे तीन महिन्यापूर्वी लोकार्पण करण्यात आले. बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाले तरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नाही. संबंधित ठेकेदारास कामाचे आदेश दिले तरी त्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. परिणामी धरणग्रस्तांना छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवून तेच गरम करून प्यावे लागते आहे. येथील कुटुंबानी उपसभापतींची भेट घेत, पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. www.konkantoday.com