
नेपाळच्या पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा, हिंसाचारानंतर निर्णय
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठे अराजक माजले आहे. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तेथील जनता चांगलीच आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे.नेपाळची राजधानी काठमांडू येथे तर प्रत्येक रस्त्यावर आंदोलक दिसत असून अनेक ठिकाणी आग लावली जात आहे. सध्या नेपाळमधील याच अराजकाची नैतिक जबाबदारी घेऊन 8 सप्टेंबर रोजी तेथील गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता नेपाळमधूनच मोठी माहिती समोर येत आहे. नेपाळमधील जनतेने तेथील सत्ता उलथवून लावली असून आता तेथील पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केपी ओली यांच्या राजीनाम्यामुळे आता काठमांडूमध्ये जल्लोष केला जातोय.




