दुष्काळग्रस्त, वादळग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कोष करण्याची मागणी
दुष्काळग्रस्त, वादळग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कोष करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी-कष्टकरी संघटनेने केली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा झाली.
सत्ताधारी सरकार मदतीची घोषणा करून प्रशासनावर जबाबदारी ढकलून मोकळे होते. पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांचा विमा उतरवण्याचे कंत्राट सरकार देते; पण नुकसानभरपाईचा हप्ता भरूनही विमा कंपन्या ज्या बेफिकिरीने टाळाटाळ करतात, ते पाहता हे सर्व थांबवायचे असेल तर नुकसानभरपाईसाठी शेतकरी आपत्ती मदतीचा स्वतंत्र कोष सरकारने निर्माण करणे गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या शेतकरी कष्टकरी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीसमोर अशोक जाधव यांनी या मागण्या मांडल्या.
www.konkantoday.com