मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांच्याबाबत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करून बदनामी करून दहा लाखाची मागणी केल्या प्रकरणी जयहिंद न्यूज चॅनलचे प्रदीप भालेकर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल
जयहिंद चॅनलद्वारे खोट्या बातम्या तयार करून समाजमाध्यमांद्वारे मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांची बदनामी केल्याबाबत व दहा लाखाची मागणी केल्याप्रकरणी जयहिंद न्यूज चॅनल मुंबईचे प्रदीप भालेकर यांच्याविरूध्द रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत महेश सामंत यांनी फिर्याद दाखल केली आहे
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की फिर्यादी महेश सामंत हे आमदार उदय सामंत यांच्याकडे सामाजिक कामकाज व पाठपुरावा तसेच किरण सामंत यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात किरण सामंत यांच्या मोबाईलवर प्रदीप भालेकर जयहिंद न्यूज चॅनल मुंबई याने फोन करून किरण सामंत यांना आपल्याकडील बांधकाम व्यवसायातील कामे मला द्या असे सांगितले किरण सामंत यांनी याबाबत विचारणा केली असता भालेकर यांनी मनात राग धरून जयहिंद चॅनलमधून खोट्या बातम्या तयार करून समाजमाध्यमांद्वारे आमदार उदय सामंत व किरण सामंत यांची बदनामी करू असे वक्तव्य करून फिर्यादी महेश सामंत यांचे सहकारी मनिष मोरे यांच्या मोबाइल फोनकॉल व व्हॉट्सअ ॅप कॉल करून व्हॉट्सअॅपच्या नंबरवर आमदार उदय सामंत यांच्याबाबत मटका वाळू माफियाअसा खोटा बदनामीकारक मजकूर तसेच किरण सामंत यांच्याबाबत अत्यंत घृणास्पद मजकूर पाठवून दहा लाख रुपयांची मागणी करून खोटा व बदनामीकारक मजकूर छापून समाजातील मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांची प्रतिमा बिघडवून टाकेन अशी धमकी दिली याबाबत रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com