महाबँक कर्मचारी आज देशव्यापी लाक्षणिक संपावर..

0
54

बँक ऑफ महाराष्ट्र आज सर्वच बाबतीत बॅंकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे. जून तिमाही पर्यंत बँकेने लक्षणीय कामगिरी केली आहे.
परंतु दिवसेंदिवस कर्मचारी संख्या कमी होते आहे. आणि त्यामुळे इच्छा असूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नाही. बँक व्यवस्थापन नवीन कर्मचारी भरतीबाबतीत अत्यंत उदासीन आहे. आणि त्यामुळेच पुढील प्रमुख मागण्यांसाठी बँकेच्या चारही संघटनांनी एकत्र येऊन आज 27 रोजी एक दिवसाचा संप पुकारला आहे.
प्रमुख मागण्या..

  1. सर्व हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे.
  2. सर्व शिपाई जागा भरणे.
  3. पुरेशी Clerks भरती करणे.
  4. बँक शाखा/एटीएम ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे.
    या मागण्यांबाबत व्यवस्थापनाने योग्य निर्णय न घेतल्यास दि 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या संपाची हाक संघटनांनी दिली आहे.
    व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याबद्दल संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे..
    www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here