
शिवसेनेच्या गुप्त बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता रायगडात उमटू लागले आहेत.शिवसैनिकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची गुप्त बैठक पार पडली.
या बैठकीला उपस्थित बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर आळवला. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असूनदेखील शिवसेनेला जिल्हयात योग्य सन्मान मिळत नाही. तटकरे हे शिवसेनेचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपातही सवतासुभा होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली
www.konkantoday.com