
धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण काकडे*
*__ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण काकडे यांची फेरनिवड झाली आहे. अखिल भारतीय धनगर समाज महासंघ म्हणून केलेले काम लक्षात घेवून २०२४ ते २०२६ या वर्षासाठी पुन्हा महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काकडे यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रवीण काकडे हे सदैव प्रयत्नशील असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच काकडे लवकरच महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारिणीची आणि जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करतील.www.konkantoday.com