एसटी महामंडळाची एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम

0
52

एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकविलेल्या भाडय़ाव्यतिरिक्त प्रवास भाडय़ाच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे.प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2021 (15 दिवस) या कालावधीदरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश केला जाणार आहे. यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाडय़ा व्यतिरिक्त प्रवास भाडय़ाच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये 100 यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून कसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here