
रत्नागिरीत रस्त्यावर गर्दी वाढू लागली ,पोलिसांकडून तपासणी सुरू
काल जनता कर्फ्युमुळे शांत असलेली रत्नागिरीत आज रस्त्यावर वाहनांची व लोकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे प्रशासनाने लोकांना केवळ अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा असे आवाहन केले आहे तरी देखील आज रस्त्यावरून फोरव्हिलर टू व्हिलर आदींची संख्या वाढली आहे पोलिसांनी अनेक रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत जाणाऱ्या येणाऱ्यांची चौकशी करीत आहेत मात्र नागरिकांनी ही सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वताहून घरात राहणे गरजेचे आहे
www.konkantoday.com