पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का, आपची मोठी मुसंडी

पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. ११७ मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप ७७ जागांवर पुढे आहे.विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत.

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग सिद्धू पिछाडीवर आहेत. बरनाला जिल्ह्यातील भदौर विधानसभा मतदारसंघात चरणजीत सिंग चन्नी मागे आहेत. या मतदारसंघात आपचे उमेदवार लाभ सिंग उग्गोके आघाडीवर आहेत. पंजाबचे कृषिमंत्री रणदीप सिंगदेखील पिछाडीवर आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button