सृजनशील संस्कृतीचा उदय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने होणारा चिपी विमानतळाला जेष्ठ संसदपटू जागतिक प्रज्ञावंत युवा नेते बॅ. नाथ पै यांचे नाव देणार आणि मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रांला कोकण रेल्वेचे शिल्पकार, देशांचे माजी अर्थ आणि रेल्वेमंत्री प्रा मधु दंडवते यांचे नाव देण्याचा मनोदय सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नुकताच व्यक्त केला ही फारच महत्वाची आणि इतिहासाचे ऋण मानणारी आणि बदलत्या वैचारिकतेचा संकेत देणारी घटना आहे. त्या बद्दल सामंत यांचे राष्ट्र सेवादल आणि पुरोगामी चळवळींच्या माध्यमातून विशेष आभार. बॅ. नाथ पै हे राजापूर मतदार संघातील पहिले खासदार. अत्यंत प्रज्ञावंत, तत्वेत्ते. जागतिक पातळीवरील सोशालिस्ट फोरम यूवा नेतृत्वाची संधी प्राप्त झालेले . त्यांचे लोकसभेतील भाषण तर म्हणजे विविध जागतिक प्रश्नांचे चिंतन आणि संशोधनच त्यासाठी पंतप्रधान पंडीत नेहरु सभागृहात थांबून रहात. प्रा. मधु दंडवते यांनी तर कोकण रेल्वेच्या माध्यमातून जो चमत्कार घडविला त्याबद्दल कोकण सदैव त्यांच्या ऋणातच राहील. महात्मा गांधी यांच्या विचारातून भारावलेली मुल्याधिष्ठीत पीढी. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणीची मुल्य जपणारी. हाच विचार आणि संस्कृती ही सिंधुदुर्गच्या मातीचा खरा गंध आहे. खरा डीएनए आहे. मात्र गेल्या काही दशकात येथील हजारो वर्षांची संस्कृतीच मुळापासून उखडून टाकण्याचा अगदी जाळून पूर्णत: नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्याला यशाची विषारी फळे ही भरभरून लागली. थरारक काळीज चिरणारी भीती आणि दहशत येथे राज्य करु लागली. आणि हीच या मातीची यापुढे संस्कृती, मी सांगेल तोच विकास आणि मी सांगेल तेच करायचे उलट बोललात तर मुडदाच पाडेन अशा एखाद्या थरार चित्रपट जणू येथे अम्मल करत असल्याचे वातावरण. विचारांची, चर्चा, संवाद , मताविष्कार, अभिव्यक्ती सारे फिजूल,तर प्रचंड भीती, दहशत, राडे आणि सन्नाटा कायमच लॅा ॲन्ड ॲार्डरचा प्रश्न. यांत सिंधुदुर्ग वासींय नाथ पै, दंडवतेंना विसरला की काय अशी शंका वाटू वागली. पण नाही कोणी किती पुसायचे म्हटले तरी इतिहास पुसला जात नाही अगदी तो बदलून खोटा लिहीला तरी. सिंधुदुर्गचे पालक मंत्री उदय सामंत यांनी ही आठवण आठवणींने जपली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार हा सृजनशील तेचा उदय आहे.

अभिजित हेगशेटये
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
राष्ट्र सेवादल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button