अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला पारंपरिक वाद्याला महत्त्व द्या : शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज (७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला रत्नागिरी शहरातील ८ सार्वजनिक आणि सुमारे १२०० घरगुती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी विसर्जन होणार असून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
८ अधिकारी व ९५ पोलीस अंमलदार या बंदोबस्तामध्ये उपस्थित असणार आहेत.  पारंपरिक वाद्यासह नियोजनबद्ध डॉल्बी व डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button