अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक पुन्हा सुरु

0
22

रविवारी मध्यरात्री अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक किरकोळ प्रमाणात दरड कोसळल्याने बंद पडली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटविली असुन अणुस्कुरा मार्गे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.
कोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटांपैकी केवळ अणुस्कुरा घाटमार्गेच सर्व प्रकारची वाहतूक सुरु आहे. सध्या या घाटमार्गे रत्नागिरी, लांजा, देवरुख यासह राजापूर आगाराच्या एसटी सेवेसह, मालवाहतूक, पेट्रोल, डिझेलसह गॅसचे टँकर, घरगुती सिलेंडरची वाहतूक, जळाणासाठी लाकडाची वाहतूक याच मार्गाने सुरु आहे.
याचबरोबर खाजगी वाहने याच घाटमार्गे ये – जा करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाने तात्काळ यंत्रणा लावून घाटात कोसळलेली दरड हटवून घाटातील वाहतूक सुरळीत सुरु केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here