
कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट, शहरातील पाच मशिदीत हाेते गणरायाची प्रतिष्ठापना
गणपती उत्सव हा हिंदू समाजाचा उत्सव असला तरी आज अनेक ठिकाणी गणेशोत्सवात अन्य धर्मीयांना देखील मानाचे स्थान असते मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणात काही ठिकाणी हिंदू धर्मीयांना मानाचे स्थान असते रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे होणारा हुरुस हा हिंदू मुस्लीम समाजाच्या एकतेचे प्रतीक मानले जाते कुरुंदवाड नगरीत देखील धार्मिक एकतेची वीण घट्ट झाली आहे. शहरातील पाच मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना झाल्याने कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट झाली आहे.या नगरीने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारी परंपरा अबाधित ठेवली आहे. मोहरम काळातही मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येउन उत्सव साजरा करतात.
येथील कुडेखान बडेनालसाहेब मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशीद या पाच मशिदी मध्ये पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सन १९८२ मध्ये शहरातील पाच मशिदींमध्ये पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कै.गुलाब गरगरे, कै.दिलावर बारगीर, कै.वली पैलवान, कै.नरसू कुरणे, कै.विठ्ठल चोरगे, विलास निटवे, महादेव माळी,आप्पासाहेब भोसले, शंकर पाटील, बापूसाहेब आसंगे, तानाजी आलासे, महावीर आवळे यांच्यासह आदी मंडळींनी सुरु केली.
गणेशोत्सवाच्या काळात मुस्लिम समाजाकडून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे गणपतीची पूजाअर्चा केली जाते.
www.konkantoday.com