
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली कणकवलीतील पुलाच्या संरक्षक भिंतीची पाहणी
मुंबई-गोवा महामार्गावरील असलेल्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्त्यावर आली होती. त्यामुळे कणकवलीत खळबळ उडाली होती. आज जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या उड्डाण पुलाच्या कोसळलेल्या बॉक्सवेल संरक्षक भिंतीची पाहणी केली व त्यांनी याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली.कणकवली शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याच्या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्या महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.
www.konkantoday.com